अंशुला कपूरच्या लग्न आणि रिसेप्शन सोहळ्यात जान्हवी कपूरने सुंदर पारंपरिक लूकमध्ये दिसली. या कार्यक्रमातील काही खास फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. यात एका गोष्टीने लक्षवेधून घेतले. नुकतेच सिने दिग्दर्शक आणि निर्माते बोनी कपूर यांची कन्या, अंशुला कपूरचा विवाह रोहन ठक्कर यांचा विवाह पार पडला. अतिशय दणक्यात पार पडलेल्या या लग्नसोहळ्यासाठी संपूर्ण कपूर कुटुंबीय आणि मित्रपरिवाराची उपस्थिती पाहायला मिळाली. या सगळ्या सोहळ्यात जान्हवी कपूरच्या लूकची चर्चा रंगली. बहिणीच्या रिसेप्शनमध्ये जान्हवीने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली सिल्क साडी नेसली होती, ज्यासोबत तिने स्ट्रॅपलेस ब्लाउज परिधान केला होता. तिच्या या मोहक लूकचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. दरम्यान, तिने तिच्या मेहंदीने सर्वांना आश्चर्यचकित केले. तिच्या मेहंदीमध्ये ‘शिखू’ हे नाव दिसत होते. जान्हवीने या कार्यक्रमातील अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमध्ये तिच्या मेहंदीवर ‘शिखू’ हे नाव लिहिलेले दिसत होते, जे तिचा प्रियकर शिखर पहारियाचे टोपणनाव आहे.
जान्हवी आणि शिखरची लव्हस्टोरी मिळालेल्या वृत्तांनुसार, जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. त्यांच्या मैत्रीचे हळूहळू प्रेमात रूपांतर झाले. त्यांच्या नात्याची बातमी 2016 मध्ये समोर आली, परंतु जान्हवीच्या ‘धडक’ चित्रपटानंतर 2018 मध्ये त्यांच्या विभक्त होण्याची बातमी समोर आली. मात्र, 2023 मध्ये, हे दोघे पार्ट्यांमध्ये, सुट्ट्यांमध्ये, अनंत अंबानींच्या लग्नसमारंभात आणि मंदिरांमध्ये अनेक वेळा एकत्र दिसले होते. यामुळे चाहत्यांना वाटले की ते पुन्हा एकत्र आले आहेत. ते तिरुपती मंदिरातही अनेकदा एकत्र दिसले होते.