© 2026 Voice News Portal
Press Esc to close
Home अर्थसंकल्प महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकांची घोषण...
महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा; मतदान 5 फेब्रुवारी तर निकाल…
अर्थसंकल्प Breaking

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा; मतदान 5 फेब्रुवारी तर निकाल…

Super Admin · 20 Jul 2026, 11:59 AM · 1 min read · 12 views
Share This Article
Facebook Twitter WhatsApp

महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा व पंचायत समिती निवडणुकांची घोषणा; मतदान 5 फेब्रुवारी तर निकाल…

Team IBN 7 : ( सांगली प्रतिनिधि : बंडू चौगुले ) : राज्यातील नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. आज (निवडणूक आयोगाकडून) निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, राज्यातील 12 जिल्ह्यात 12 जिल्हा परिषदा (Zilla Parishad) आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान होणार आहे. मतदानाची तारीख 5 फेब्रुवारी ठरवण्यात आली असून, निकाल 7 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता जाहीर केले जातील. निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होताच संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्यातील राजकीय पक्ष आणि उमेदवार आता प्रचारकर्मात व्यस्त असणार आहेत, तर नागरिकांमध्येही उत्सुकता वाढली आहे.

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांची घोषणा आज करण्यात आली. त्यानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, पुणे, सातारा, सांगली, छ. संभाजीनगर, परभणी, धाराशिव, कोल्हापूर जिल्ह्यात निवडणुका होत आहेत. उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी 16 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत मुदत देण्यात आली आहे. आयोगाने निवडणुकीने घोषणा करताच 12 जिल्हा परिषदेत आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निवडणुका घेण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार आयोगाने 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी केली होती.

#Breaking #Bollywood
Comments (0)
Leave a Comment